मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत व शैक्षणिक वर्षे वाया गेल्याबाबत वालावल देऊळवाडी येथील शेख शमशुद्दीन युनुस यांनी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांना कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथील कार्यक्रमात लेखी निवेदनाद्वारे शिक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटलें आहे की, शमशुद्दीन युनुस शेख, रा. वालावल या अर्जाव्दारे आपणांस कळवू इच्छितो की, माझी मुलगी कु. शेख राहिन शमशुद्दीन, ही संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे शिकत होती. तीने शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ या वर्षी बी.एस्.सी. तृतीय या वर्गाची सहावी सेमिस्टर परीक्षा मार्च-एप्रिल या कालावधीत दिली होती. तिचा सिट नं.३००८०४१ असा होता. या परीक्षेचा निकाल २० जून २०१९ रोजी लागला त्यात तुमच्या निकालप्रक्रियेत अनुत्तीर्ण ठरविले.
पुन्हा या निकालाविरोधात आपल्याकडे दाद मागण्यासाठी फेर तपासणी अर्ज दाखल केला त्याचा निकाल ५ सप्टेंबर २०१९ रोजी च्या प्रमाणपत्राने ती उत्तीर्ण असा जाहिर झाला.परंतू या निकाल प्रक्रियेतील अनुत्तीर्ण ते उत्तीर्ण या प्रकियेत माझ्या मुलीची मानसिक स्थिती बिघडली तीची समजुत काढण्यात माझीही मानसिक स्थिती बिघडली. तसेच तिचे शैक्षणिक वर्ष ही वाया गेले. याला जवाबदार कोण? काही बरे वाईट घडले असते तर. या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या निकालामुळे माझे घर ही आज वर्षभर भितीच्या छायेखाली वावरत होती.
तसेच हे वर्ष सन २०२० कोविड-१९ या महामारीच्या विश्वसंकटाने लॉकडाऊन झाल्यामुळे अशी सलग दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे आता तिला पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या दृष्टिनेही तिच्या या शैक्षणिक नुकसानामुळे अत्यंत संघर्ष करावा लागणार आहे. तरी आपण शासनातर्फे तिला योग्य न्याय मिळवून द्यावा.
या सर्व विद्यापीठाच्या प्रक्रियेला जो कोणी जबाबदार असेल. त्यावर कडक कारवाई व्हावी. माझ्या मुलीचे वाया गेलेले २ वर्ष तिला परत मिळणे शक्य नाही. तरी आपण या संपूर्ण निकालप्रकिये संबंधी योग्य तो न्याय देऊन माझ्या मुलीस योग्य ते मार्गदर्शन करावे.असे शेख यांनी पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.