मालवण /-

मालवण तालुक्यातील कट्टा वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी श्री ब्राम्हणदेव मंदिरात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड परिसरातील वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ब्राम्हणदेव मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अशोक उर्फ काका गुराम, शाखाप्रमुख मिलिंद गुराम, शाखाप्रमुख बाबू गोठणकर, प्रमोद गुराम, रविंद्र सांडव, शिवराम गुराम, विश्राम गुराम, धोंडी घोडगेकर, रामचंद्र चव्हाण, सागर गुराम, सूर्यकांत कुडाळकर, रंजित कदम, निकेश घोडगेकर, विजय गुराम, माजी ग्रामपंचायत सदस्य राजश्री कदम, विजया गुराम, विद्या गिरकर, पूजा गोठणकर, उशा घोडगेकर, त्रिवेणी पालव, निकिता गुराम, दिव्या गोठणकर, वैशाली घोडगेकर, सिया चव्हाण, संजना कुडाळकर, दत्ताराम गुराम, अमोल गोठणकर, भगवान घोडगेकर, भास्कर गुराम आदी ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, ज्येष्ठ कार्यकर्ते मामा माडये, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, दिलीप कांबळी, माजी सरपंच सतीश वाईरकर, उपसरपंच मकरंद सावंत, आशिष हडकर, गणेश वाईरकर सागर मालवदे, अण्णा कुबल, आबा कामतेकर, नंदू वालावलकर, राजू परुळेकर, बाबू शंकरदास, निलेश केळुसकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे निलेश राणे यांनी स्वागत करतानाच आपल्यावर कधीही अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देत असल्याचे सांगितले.

दरम्यान, शरीराने आमच्या पासून हे ग्रामस्थ दूर असले तरीही प्रत्येक निवडणुकीत या वाडीने राणे कुटुंबीयांवर प्रेम दाखवले आहे. कितीही वादळे कितीही वादळे, कितीही लाटा आल्या तरीही ही वाडी आमच्या पाठीशी उभी राहिल्याचे सांगत निलेश राणे यांनी येथील ग्रामस्थांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. जिवंत असेपर्यंत तुम्हा ग्रामस्थांची साथ सोडणार नाही. या वाडीतील रस्ते विकासाचे प्रश्न प्रलंबित असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून येथील विकास कामांना चालना दिली जाईल, असा शब्द श्री. राणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page