मालवण तालुका स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

मालवण तालुका स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

विनोद दळवी अमोल गोसावी झुंजार पेडणेकर यांचा समावेश..

मालवण /-

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१९-२० या वर्षासाठी दिला जाणारा तालुकास्तरीय कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे पत्रकार विनोद दळवी यांना तर तालुकास्तरीय कै. अ‍ॅड. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे पत्रकार अमोल गोसावी यांना जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला पत्रकार समिती पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवॉर्ड हा विशेष पुरस्कार पत्रकार झुंझार पेडणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ जानेवारीला नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होणार असल्याची माहिती मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी आज समितीच्या झालेल्या विशेष सभेत केली. दरम्यान मालवण पत्रकार समितीच्या वतीने गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पत्रकार डी. टी. मेथर, विवेक नेवाळकर, पी. के. चौकेकर, सौगंधराज बादेकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. मालवण तालुका पत्रकार समितीची विशेष सभा आज शासकीय विश्रामगृह येथे समिती अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अमित खोत, सचिव प्रशांत हिंदळेकर, खजिनदार कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, महेश कदम, विनोद दळवी, संग्राम कासले, परेश सावंत, सिद्धेश आचरेकर, संतोष हिवाळेकर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी सन २०१९- २० यावर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची तसेच बेस्ट स्टोरी अवॉर्ड या विशेष पुरस्कार प्राप्त विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण ५ जानेवारीला नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजाजन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे यांना निमंत्रित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

अभिप्राय द्या..