कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर..

कुडाळ /-

बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनि पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.त्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गने याबाबत आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्गात गांजा विक्री चे खरे सूत्रधार उजेडात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचा मागणी केली.सदरची घटना घडून झाल्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गचे श्री. रमाकांत नाईक व श्री. स्वरूप वाळके यांना पुढाकार घेऊन अवैध व्यवसाय विरोधात आवाज उठवला म्हणून,समाज विघातक प्रवृत्ती कडून धमकी देण्याचा भाग होत आहे. मागील दोन दिवसांपासून सदर शिवप्रेमींना ‘सांभाळून राहा’ ‘तुमचं बघून घेतो’ अशा आशयाच्या धमकीचे संदेश अप्रत्यक्षपणे शिवप्रेमींना मिळत आहे.

त्यामुळे शिवप्रेमींवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी यासंदर्भात त्वरित दखल घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जात गांजा व अवैध व्यवसायाच्या रॅकेट समूहाचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. शंकर कोरे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.यावेळी राजू दळवी, अभय जोशी, सर्वेश ठाकूर, दिनेश साळुंखे, हेमंत कांदे, शैलेश राऊत, अक्षय कुंभार, सर्वेश पावसकर, प्रथमेश डिगसकर, बाबु वाघकर, दक्ष पटेल, कृष्णा, गणेश कारेकर, किरण कुडाळकर, रमाकांत नाईक, स्वरूप वाळके, राजवीर पाटील, दैवेश रेडकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page