सागर नाणोसकर यांनी केली महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी –
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करण्यात यावी,अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर सोमकांत नाणोसकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहन निरीक्षकांची कमतरता असल्याने सिंधुदुर्गात वाहन चालक परवाना देणे कोव्हीडच्या सात ते आठ महिन्याच्या कालावधीत बंद आहे.सिंधुदुर्ग तसेच शेजारील गोवा राज्यात नोकरीसाठी मोटार सायकलने प्रवास करणाऱ्या युवकांना – नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांकरवी दंडात्मक त्रास सहन करावा लागत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या आठ वाहन निरीक्षकांपैकी चार निरीक्षकांची बदली काही महिन्यांपूर्वी इतर जिल्ह्यात करण्यात आल्याने या अडचणीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.तरी सदर भरती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.