आचरा /-
चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील लोकांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे.
चिंदर सडेवाडी गोलतकर वाडी,आचरा तुरुपवाडी या भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यात घटत असल्याने या कालावधीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते.या दृष्टीने येथून वाहणाऱ्या ओहोळावर येवढ्यातच बंधाऱा बांधल्यास विहीरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकेल या हेतूने चिंदर सडेवाडी येथील पेट्रोल पंपाचे मालक शशिकांत गोलतकर यांनी येथील ग्रामस्थांना एकत्र करत श्रमदानातून बंधारा बांधण्याचा संकल्प केला आणि येथील ग्रामस्थ बच्चू सरगुरू, विशाल गोलतकर, शंकर हडकर, मिलिंद पाटील,रवी गावडे,राजा कांबळी, निलेश परब, संभाजी कदम, कृष्णा कांबळी, सुधीर मसुरकर आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने वाळू आणि मातीचा वापर करून सोमवारी या ओहोळावर बंधारा बांधला. या बाबत बोलताना गोलतकर यांनी सांगितले की या बंधाऱ्यामुळे या परीसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून या भागातील चाळीस पन्नास घरांना तसेच लगतच्या शेतकरी बागायतदारांना फायदा होणार आहे