असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

आचरा /-

सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना आचरा पारवाडी येथील राजू परब यांना रस्त्यात सापडलेले पंधरा ग्रामचे सोन्याचे ब्रेसलेट राजा जोशी यांना परत करत प्रामाणिक पणा दाखविला त्याच्या या प्रामाणिक पणा बद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आचरा पारवाडी येथे मंगळवारी पहाटे दुध आणण्यासाठी गेलेले काकडा आरती कार्तिकोत्सव मंडळाचे सदस्य राजा जोशी यांचे हातातील सोन्याचे ब्रेसलेट गहाळ झाले होते.याची कल्पना त्यांना घरी गेल्यावर झाल्याने त्यांची भितीने गाळण उडाली होती. या दरम्यान आचरा पारवाडी येथून माॅर्निग वाॅकला गेलेल्या राजू परब (पानवाले) यांना पारवाडी गणपती मंदिर रस्त्यावर सोन्याचे पडलेले ब्रेसलेट मिळाले.सदर ब्रेसलेट रस्त्यावर शोधाशोध करणारया राजा जोशी यांचे असण्याची शक्यता धरून त्या बद्दल खात्री करून त्यांना परत केले.त्यांच्या या प्रामाणिक पणा बद्धल आचरा देवूळवाडी येथील,काकड आरती कार्तिकोत्सव मंडळाकडून त्याचा गौरव केला गेला.

अभिप्राय द्या..