कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७२ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ११ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण ११७२ तर बरे झालेले रुग्ण १११७ आणि सक्रिय रुग्ण १६ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, तसेच २ स्थलांतरित झाले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.