ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड..

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड..

मालवण /-

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या शिफारशीने महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिले आहे. रमेश बुट्टे गेली अनेक वर्ष समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करीत आहेत त्यांच्या कार्याचा विस्तार अधिक जोमाने हवा व त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी त्यांची मालवण तालुका उपअध्यक्ष पदी निवड करीत आहोत असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

धनगर समाजाचे संर्वधन आणि समाजहिताचे रक्षण या हेतून राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद प्रांत भेद भाषा भेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात आपल्याला सामील करून घेऊन आपल्या कार्याचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी कार्यक्षेत्र विस्तारीत व्हावे यासाठी आपली नेमणूक केल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..