नवी दिल्ली /-
कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक बनावट अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या काळात बनावट मेसेजद्वारे अनेक दावे केले जात आहेत.आजकाल, आणखी एक असाच मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार महिला स्वरोजगार योजनेंतर्गत सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1 लाख रुपये देत आहे. पण भारत सरकारच्या PIB या संस्थेने या व्हायरल मेसेजचे मागचे वेगळेच सत्य उघड केले आहे. चला तर मग या बातमीत किती सत्य आहे ते जाणून घेऊयात .
नक्की सत्य काय आहे ते जाणून घ्या
हा दावा खोटा असल्याचे PIB नेही पुष्टी केली आहे.महिला स्वरोजगार यासारखी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही आहे.कोरोना काळातील बेरोजगारीमुळे अशा बनावट बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीचा इन्कार करत म्हटले आहे की, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना कालावधीत अशा बनावट बातम्यांचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारनेही अनेक प्रयत्न केलेले आहेत.
PIB Fact Check-PIB Fact Check केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते.सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. एक पीआयबी फॅक्ट चेकवर व्हाट्स अॅप नंबर 918799711259 वर स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल पाठवू शकता किंवाpibfactcheck@gmail.com वर मेल करू शकता.