गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ शिबिर मोहिमेला तारकर्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ शिबिर मोहिमेला तारकर्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते झाले उदघाटन..

मालवण /-

जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून मालवण तालुक्यातील तारकर्ली शिवसेना शाखेच्या वतीने या रक्तदान’शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्याला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते रक्तदानासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील कोविड ग्राम समितीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले.या रक्तदान शिबीरात विशेष म्हणजे महिला वर्गाच्या वतीने दर्शना कुंटे हिने रक्तदान करून महिला वर्गामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यावेळी तारकर्ली शाखाप्रमुख आबा‌ केळूसकर, संदिप भोखर,राजु मेस्त्री, प्रभाकर राकम,मोंडकर,भिवा कोळंबकर, रमेश कादरेकर, मुकुंद मयेकर, सतिश टिकम,रोहन‌ तावडे, वैभव सावंत उपस्थित होते.

अभिप्राय द्या..