पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी..

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी..

मुंबई /-

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात होत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार सुरू आहे.यातच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अभिप्राय द्या..