जिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;”तो आवाज ” कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांची माहिती..

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;”तो आवाज ” कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांट मध्ये 3 मे रोजी मध्यरात्री सव्वादोन च्या सुमारास झालेला स्फोट सदृश्य आवाज हा कॉम्प्रेसड गॅस चा नोझल लूज झाल्यामुळे आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सकाळीच 8 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन प्लांट ची पाहणी केली.आणि आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सिलेंडर मध्ये गॅस कॉम्प्रेसड करून भरलेला असतो. काही वेळा सिलेंडर चे नोझल लूज होऊन असा मोठा आवाज येतो. हा आवाज 100 डेसीबील पेक्षाही जास्त असतो. नोझल लूज झाल्यामुळे गॅस बाहेर येतो. मात्र ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. ऑन ड्युटी नर्स प्रगती कदम यांनी नोझल लूज होऊन स्फोट सदृश्य आवाज येताच प्रसंगावधान राखून इमर्जन्सी स्विच ऑन केला. सहकारी सर्व स्टाफ ने स्थिती नियंत्रणात आणली.

अभिप्राय द्या..