दोडामार्ग /-
कोरोना काळात पञकारांना भेडसावणाऱ्या समस्य
दूर करा,कोरोनामुळ मृत्यू झालेल्या पञकाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा .महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्ग यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या कडे तालुका मिडिया अध्यक्ष तुळशिदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा मिडिया उपाध्यक्ष प्रमोद गवस,तालुका मिडिया उपाध्यक्ष गोविंद शिरसाट, सचिव सुयश गवस आदी पत्रकार उपस्थित होते.गेल्या वर्षापासून महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे दूष्टचक्र यांनी थैमान घातले आहे. या कोरोना काळात लोकात जनजागृती करण्याचे काम व पञकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
पञकारांना कोरोनाची लागण झाली.काही जणांना जीव गमवावा लागला.तर काहीजण बरे होऊन घरी परतले पुन्हा काम सुरू केले.पञकार मंडळी यांना किरकोळ मानधनावर काम करावे लागते .सरकारी अधिकारी कर्मचारी यांना लाखो रुपये सरकारी मानधन दिले जाते.पण शासनाकडून पञकार मंडळी यांना पेन्शन योजना, तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी अनेक वेळा सरकारकडे मागणी करुन देखील राज्य सरकारने पञकारांच्या मागण्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला नाही त्यामुळे आज अनेक पञकारांना मोठ्या संकटातून जावे लागत आहे.
कोरोना विषणूच्या पाश्र्वभूमीवर पञकार मंडळी फिल्डवर जाऊन काम करतात.कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.यात अनेक पञकार याचे बळी ठरत आहेत.कोरोनाची लागण झालेल्या पञकाराच्या उपचारासाठी येणारा खर्च ही रक्कम पण नसते. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पञकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पण सरकार कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जात नाही.
तेव्हा मुख्यमंत्री महोदय आमची आपल्याला विनंती आहे.कोरोना काळात वृत्तपञात सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पञकाराचे विमा पॉलिसी शासनाने उतरावी,२५ ते ३० वर्षांपासून काम करणाऱ्या पञकारांना शासनाने पेन्शन योजना लागू करावी.कोरोना काळात आर्थिक मदत दिली जावी. कोरोना काळात ज्या पञकारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.तरी या निवेदनाचा जाणीवपूर्वक विचार करून पञकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी तुळशिदास नाईक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page