मसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान!

मसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान!

मसुरे /-

मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे देवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपताना प्रतिवर्षी उपरोक्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी ओम साई स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष तथा मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगावकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे वैधकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास बेळणेकर, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुनिल बागवे, अधिपरीचारीका
श्रीम. हेमांगी रणदिवे,
कीशोर नांदगावकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
नितीन गांवकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे यांनी रक्त संकलन केले.
शिबिर यशस्वीतेसाठी बच्चू प्रभुगावकर, राजू प्रभुगावकर, बबलू प्रभुगावकर, चंद्रकांत परब, नागेश सावंत, सचिन पाटकर, विज्ञान पारकर, बापू मसुरेकर, सौरभ मयेकर, स्वप्नील मयेकर, पपी सागवेकर, योगेश परब, दिनेश मसुरकर, आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सर्व रक्तदात्यांचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले. व सर्वाना सन्मानपत्र देण्यात आले. आभार बच्चू प्रभुगावकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..