वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी १ मे रोजी आलेल्या अहवालात तब्बल ४५ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये शहर एरियात १२ व्यक्ती तसेच ग्रामीण भागात ३३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ येथे ११,उभादांडा ५,आरवली ४,आडारी ३,परबवाडा ३,शिरोडा १, होडावडा १,दाभोली १,म्हापण १,परुळेबाजार १,आसोली १,पाल १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.
दरम्यान शुक्रवारी ३० एप्रिल रोजी आलेल्या अहवालात एकूण २७ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला असून १ व्यक्तीचा कोव्हीड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात सागरतीर्थ २,रेडी २,आसोली ३,उभादांडा ५,शिरोडा ५,मातोंड ३,परबवाडा १,दाभोली १,आडेली १ आणि शहर एरियात ४ व्यक्ती अशा एकूण २७ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत.