दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील<br>कोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने दिली सव्वा लाखांची औषधे..

दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील
कोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने दिली सव्वा लाखांची औषधे..

गरज पडल्यास स्वखर्चाने डॉक्टरही उपलब्ध करून देऊ.;दत्ता सामंत यांचे प्रशासनास आश्वासन..

मालवण /-
मालवण कुंभारमाठ तंत्रनिकेतन येथील ७५ बेडच्या शासकीय कोविड केअर सेंटर येथे औषधांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती उद्योजक तथा भाजप नेते दत्ता सामंत यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार कोविड सेंटर येथील रुग्णांना आवश्यक असणारी सुमारे सव्वा लाख किमतीची औषधे स्वखर्चातुन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत. दत्ता सामंत यांच्या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याच्या सोबत आता काही ठिकाणी औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. औषधां अभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्णांना योग्य उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत या उदात्त हेतूने सामंत यांनी सुमारे सव्वा लाखांची औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

अभिप्राय द्या..