चौके येथे रक्तदान शिबीर ; २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; कुमारी रसिका गावडे ठरली चौके गावातील पहिली महिला रक्तदाती..

चौके येथे रक्तदान शिबीर ; २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; कुमारी रसिका गावडे ठरली चौके गावातील पहिली महिला रक्तदाती..

चौके /-


मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या कल्पनेतुन गाव तिथे शाखा ; शाखा तिथे रक्तदान’ या मोहिमे अंतर्गत आज शुक्रवार दिनांक २३ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या रक्तदान शिबीराचा शुभारंभ भ .ता. चव्हाण म. मा. विदयालय चौके या ठिकाणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला मालवण तालुका शिवसेना प्रमुख जि. प. सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, चौके शाखा प्रमुख संजय गावडे, मालवण युवा सेना प्रमुख मंदार गावडे, सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे, अतोन फर्नांडिस, भूषण मेस्त्री, कुंभारमाठ सरपंच भोगावकर , विशाल धुरी आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
देवबाग विभागीय या रक्तदान शिबीरामध्ये एकुण २१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी चौके गावातील युवती रसिका संतोष गावडे हिने पहिल्यांदाच रक्तदान करून चौके गावामध्ये प्रथम महिला रक्तदाती होण्याचा मान मिळविला. या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन कोविड काळात रक्तदानाची गरज भागविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी हरी खोबरेकर यांच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी रक्तसंकलन अधिकारी डॉ. श्रीनिवास बेळठोकर, रक्तपेटी चे सुनिल बागवे, किशोर नांदगावकर हेमांगी रणदिवे, उल्हास राणे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..