सिंधुदुर्गनगरी /-
कोविड – १९ आजाराने जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात स्मशानशेड उभारण्यात आली आहे. आता मृतांची संख्या वाढत असल्याने सदर स्मशानशेड शेजारी आणखी एक स्मशानशेड सन २०२० मध्ये उभारण्यात आली.सदर स्मशानशेडमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागेश आरोसकर यांना कंत्राटदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित मृत्यापावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सदर सेवा विनामूल्य आहे. याबाबत काही अडचण असल्यास सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्गनगरी या शाखेतील पुढील अधिकारी व कर्मचारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय यादव, समन्वय अधिकारी मोबाईल क्र. – ९६८९०२४८६४, ऋषिकेश पानगले, लिपीक, सहा. समन्वय अधिकारी, मोबाईल क्र. – ९६२३९९७७५६ तर नागेश आरोसकर, ठेकेदार मोबाईल क्र. – ९४०५६३१७०१ या प्रमाणे नियुक्ती करण्यात आली असल्याचे अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सांगण्यात आले आहे.