भाजपच्या माहिलाजिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी सामजिक बांधिलकी जपत कोव्हिडं सेंटरला पुरविल्या पाणी बॉटल..

भाजपच्या माहिलाजिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी सामजिक बांधिलकी जपत कोव्हिडं सेंटरला पुरविल्या पाणी बॉटल..

कुडाळ /-

भाजपच्या माहिलाजिल्हाध्यक्षा तथा कुडाळ नगरपंचायत च्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी सामजिक बांधिलकी जपत आज कुडाळ येथे नव्याने सुरू केलेल्या कोव्हिडं सेंटरला स्व.खर्चातून पाणी बॉटल पुरविल्या आहेत.पणदूर गावचे सरपंच तथा भाजपा चे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल हे आज कुडाळ येथील कालच सुरू झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये पणदूर गावातील कोव्हिडं पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी गेले होते.त्यावेळी या नव्यानेच चालू झालेल्या कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये काही कमतरता असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे या ठिकाणी बसविण्यात आलेले पाणी शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित न झाल्याने दाखल असलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.त्यामुळे त्यांनी ही गोष्ट त्यांनी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे यांच्या कानावर घातली त्यानंतर *सौ.संध्या तेरसे यांनी कोविड यांनी तात्काळ कोविड सेंटरला भेट देत पेशंटसाठी २०० बॉटल  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली.जिल्हा प्रशासन गेले वर्ष भर या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करणार असे सांगत आहे आणि आज कोविड पेशंट एडमिट झाल्यावर पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा पेशंटना उपलब्ध नाही खुपच खेदाची बाब आहे.

सौ.संध्या तेरसे यांनी कोविड सेंटरला ड्युटीवर असलेल्या दुधगावकर मॅडम शी संपर्क साधत तालुक्यातील येणाऱ्या पेशंटसाठी काही आवश्यक असल्यास सांगा आम्ही आमची जबाबदारी म्हणून नक्कीच सहकार्य करु असे आश्वासन दिले.यावेळी कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी स्वखर्चातून कोव्हिडं सेंटरला पाण्याच्या बोटलचा पुरवठा केला यावेळी त्यांच्या सोबत कुडाळ नगरपंचायत नगरसेवक सामजिक कार्यकर्ते श्री.सुनील बांदेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..