रस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील 20हजार रुपये लंपास.;कुडाळ पोलिसात नोंद..

रस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील 20हजार रुपये लंपास.;कुडाळ पोलिसात नोंद..

कुडाळ /-

रस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील वीस हजार रुपये रक्कम लंपास केली.ही घटना कुडाळ बाजारपेठेत एका कामगाराच्या बाबतीत बुधवारी दुपारी घडली.कुडाळ शहरात बाजारपेठेतून जात असताना एका कामगाराचे एटीएम कार्ड पडले. काही तासातच त्याच्या मोबाईलवर एका पाठोपाठ एक असे दोन वेळा मँसेज आले. यावेळी त्याने आपला मोबाईल तपासल्यावर त्याच्या खात्यातून दोन वेळा दहा हजार असे वीस हजार रुपये रक्कम बँक खात्यातून कोणीतरी काढल्याचे लक्षात आले. यावेळी त्याला आपले एटीएम कार्ड गव्हाळ झाले असल्याचे लक्षात आले. त्या एटीएम कार्डच्या मागे त्याने आपल्या एटीएमचा कार्ड नंबर समजावा म्हणून तो लिहून ठेवला होता. सबंधित अज्ञाताने याची संधी साधत वीस हजार रुपये रक्कम या कामगाराच्या खात्यावरून लंपास केली. एटीएम सोबत त्याला नंबरही मिळाल्याने त्याला विनासायास बँकखात्यावरील रक्कम हडप करण्यात यश आले.अखेर या कामगाराने पोलिसात धाव घेत आपली कैफियत पोलिसांना सांगितली.

अभिप्राय द्या..