आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..

आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..

वेंगुर्ला /-

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील महाविद्यायलीन युवक युवतीच्या वैचारिक प्रगल्भतेला वाव देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विभागाची ११ वी तील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु.आशिया आसद सांगावकर हिने यश मिळवत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आला होता.या विद्यार्थीनीला प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या प्रशालेच्या मुख्याध्यापिका बोवलेकर ,संस्था अध्यक्ष राऊळ ,संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..