कुडाळ तालुक्यात गुरूवारी सापडले 26 कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात गुरूवारी सापडले 26 कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात 26 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 06 ,आणावं 2,ओरोस 7,कसाल 2 ,पडवे 1,रांबांबुळी 1,पाणडुर 1,सरंबळ 1,बिबवणे 1,नेरूर 1 ,मांडकुली 1,आंबडपाल 1,चेंदवन 1,असे एकूण 26कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 772 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 701 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 71 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 1988 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1596 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 336 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 09 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 47 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..