केळुस येथे आग लागून आंबा कलमांचे ३२ हजार रु.नुकसान..

केळुस येथे आग लागून आंबा कलमांचे ३२ हजार रु.नुकसान..

वेंगुर्ला /-
तालुक्यातील केळुस कुडासवाडी येथील अतुल सामंत यांच्या आंबा कलम बागेस काल रात्रौ ते पहाटे च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील १६ आंबा कलमे जळून सुमारे ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही आग लागल्याचे सकाळी ९ – ९.३० च्या सुमारास समजताच येथील स्थानिकांनी आग विझविण्यास सहकार्य केले.याबाबत आज गुरुवारी तलाठी पी.एस.गवाणकर,पोलिसपाटील प्रभाकर केळुसकर यांनी पाहणी करुन पंचयादी केली आहे.

अभिप्राय द्या..