कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण..

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने हे समाज मंदिर लोकार्पण करण्यात आले याचे उद्घाटन या प्रभागाच्या नगरसेविका सौ. सरोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ग्रामपंचायत कालावधीमध्ये बांधलेल्या समाज मंदिराची दुरवस्था झाली होती हे समाज मंदिर अनेक सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगात येत होते. तसेच ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वस्तीला पुराचा तडाखा बसत असे त्यावेळी पूरग्रस्तांना राहण्याची व्यवस्था या समाज मंदिरामध्ये केली जात होती मात्र दुरवस्था झाल्यामुळे या समाज मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम होत नव्हते यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा निधी देण्याचे कबूल केले होते. मात्र या समाज मंदिरासाठी कोणत्याही प्रकारचा त्यांनी निधी दिला नाही वारंवार या वस्तीतील नागरिकांनी मागण्या केल्या अखेर नगरपंचायतीकडे दुरुस्तीसाठी मागणी केल्यावर कुडाळ नगरपंचायतीने या मागणीवर विचार करून नादुरुस्त झालेल्या समाज मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला यासाठी प्रभागाच्या नगरसेविका सौ. सरोज जाधव यांनी प्रयत्न केले हे समाज मंदिर दुरुस्त करण्यात आले दुरुस्त केलेल्या या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले कोरोना महामारीचे नियम पाळून हे उद्घाटन करण्यात आले यावेळी जय भीम युवक मंडळाचे माजी अध्यक्ष व्ही. डी. जाधव, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर, भारतीय बौद्ध महासभेचे शंकर कदम, आर. डी. चेंदवणकर, नाना नेरुरकर, नागरिकांमध्ये आत्माराम जाधव, विलास कुडाळकर, रजनीकांत कदम, जीवन कुडाळकर, राजेश कुडाळकर, किशोर कुडाळकर, यशवंत कुडाळकर, संतोष कुडाळकर, उदय कदम, प्रवीण कुडाळकर, देवदास जाधव, सुंदर तेंडोलकर तसेच आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी समाज मंदिराला नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, स्वीकृत नगरसेवक राकेश कांदे तसेच सौ रेवती राणे, सौ. ममता धुरी, सौ. आदिती सावंत, राजवीर पाटील यांनी भेट दिली.

अभिप्राय द्या..