डुकरा साठी ठेवलेल्या हातबाॅंब मुळे कुत्र्याचा मृत्यू.;आचरा येथील घटना

डुकरा साठी ठेवलेल्या हातबाॅंब मुळे कुत्र्याचा मृत्यू.;आचरा येथील घटना

आचरा /-

रानटी डुकरांच्या शिकारी साठी आचरा पारवाडी येथील डोंगरावर अज्ञाताने ठेवलेल्या बाॅंब मुळे पाळीव कुत्रे मृत्यूमुखी पडत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये यांनी केली आहे.
आचरा पारवाडी देवूळवाडी मध्ये पसरलेल्या डोंगरांवर अज्ञाताकडून डुकरांसाठी गावठी बाॅंब ठेवले जात आहेत.आपल्या बागेतील काजू काढण्यासाठी गेलेले माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये यांच्या हि बाब निदर्शनास आली.गावठी बाॅंब मुळे कुत्रेही मरुन पडले होते. या मुळे ग्रामस्थ या भागात जाण्यास घाबरत असून याचा फायदा काही काजू चोर उचलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या गावठी बाॅंब मुळे पाळीव जनावरांनाही धोका निर्माण होऊ शकतो या मुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे

अभिप्राय द्या..