कुडाळ /-

मार्च २०२०ला करोना आपल्याकडे आलाय, गेले वर्षभर आपण काय खबरदारी घेतली खास करून आरोग्य यंत्रणेने हेच मोठं कोड आहे, मार्च २०२१पर्यंत आपल्या जिल्ह्याने चांगलं काम केल का?…… कि करोना नव्हता ३१ मार्च पर्यंत करोना नव्हता का कि त्यालाही इअर एंडिंग होतं ? सर्व बँकेने आपली व्याजासकट कर्ज वसुली केली, त्यावेळी करोना शांत कुंभकर्णासारखा झोपला होता का? कि त्यालाही लॉकडाऊन मध्ये होरपळलेल्या जनतेची दया नव्हती का? याचं उत्तर अजूनही मिळत नाही.

५एप्रिल नंतर एवढा करोना अकस्मात ५० पटीत वाढला कसा ? गेले वर्षभर लोकांनी मेडिक्लेम काढले हे करोना ला समजले की काय? आता तर म्हणे होमकॉरंटाईन बंद केलेय! प्रत्येक व्यापाराला तसेच इतर खाजगी मालकांना सक्ती केली म्हणून पेशंट वाढलेत का? खाजगी हॉस्पिटल डॉक्टर ज्यांनी आपली हॉस्पिटल covid साठी दिलीत, त्यांची बिलं तपासली तर आपल्याला खरी परिस्तिथी लक्षात येईल, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली असती तर आज खाजगी हॉस्पिटलची भरमसाठ कमाई थांबली असती, बरं ते जाऊदे, करोनावर उपाय काय तेच कोणी सांगत नाहीत, रेडिमेसीवीअर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठा हेच उपाय, ज्या लोकांना कोवीड झालाय त्या सर्वांना नेमके उपचार मिळताहेत का ? जे घरीच उपचार घेत आहेत, काहींनी तर काही उपचार घेतलेच नाहीत, ते पूर्ण बरे कसे होतात ?आपली सरकारी हॉस्पिटल्स एवढी सक्षम आपण करू शकत नाही का कि राजकीय यंत्रणेला ती करायची नाही आहेत ?

गेले वर्षभर राजकीय मंडळींनी कोणते खबरदारीचे उपाय केलेत ? की करोना काय फक्त महाराष्ट्रातच वाढतोय काय ? की आपली आरोग्य क्षमता चांगली नाही आहे? आता पुन्हा लॉकडाऊन होईल पुन्हा नागरिकांच्या पदरी उपासमारी येईल, ज्यांची हातावर पोटं आहेत त्यांचं जगणं मुश्कील होईल,बघा करोना काय आहे हेच समजून येत नाही, वाढलेले रुग्ण ही भीषणता आहे, पण सामान्य लोकांनी मरावं आणी श्रीमंत लोकांनी खासगी डॉक्टर कडे भरमसाठ बिल देऊन जगावं का,हेच समजत नाही आता पर्यंत शासनाने या संदर्भात कोणत्या निधी संदर्भात तरदूत केलीय, जी सरकारी हॉस्पिटलं मंजूर झालीत ती का चालू करत नाही? मी तर म्हणेन सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रा मधील आरोग्य यंत्रणा या कामी निरूपयोगी ठरलेलीआहेत.

एप्रिल आज १३ दिवस झालेत, त्यातील आकडेवारी बघितल्यावर लक्षात येईल कि सामान्य जनतेत भीती पसरवीरण्याचे काम चाललंय, आता होकॉरंटाईन बंद झाल्यावर जिल्ह्यात असलेले बेड विचारात घेता, ऍडमिट करायला जागाच नसणार, एप्रिल नंतर मग काय तर खाजगी कोवीड हॉस्पिटल आहेतच, खरोखरच याबाबत विचार करणे गरजेचे आहे, या नमूद भावना या माझ्या वैयक्तिक आहेत ह्यामागे कोणत्या डॉक्टर तसेच इतर राजकीय व्यकीच्या, भावना दुखवायच्या नाहीत, मला वाटलेले काही प्रश्न मी या प्रसिद्धी माध्यमाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हे सामान्य माणसाचेही प्रश्न आहेत,पुन्हा एकदा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी असावी धन्यवाद ! आपला अॅड.विवेक मांडकुलकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page