कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाचे एकूण 58 रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे ०९, आणावं ०४ ,ओरोस ११ ,कसाल ०१,आवळेगाव ०१,पिंगुळी ०८,वेताळ बांबर्डे ०१ ,वाडीवरवडे ०१ ,संगीरडे ०३,सरंबळ ०२ ,घवनाळे ०१,झाराप ०१,बिबवणे ०१,नेरूर ०१,मांडकुली ०१,आंबडपाल ०१,माणगाव ०१, हुमर्स ०२ ,पाट ०१,वालावल ०३ ,गोवेरी ०१ ,असे एकूण 58 कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 772एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 884 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 88 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 1878 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1558 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 266 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०९ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४५ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page