वेंगुर्ला /-
कुडाळ मालवण कुंभारमाठ येथील जानू झोरे यांच्या शेळ्यांच्या कळपाला बिबवणे येथे बोलेरोने धडक दिल्याने त्यांच्या १६ शेळ्या मृत व ७ शेळ्या जखमी झाल्या होत्या. तसेच निळेली येथील पंढरी येडगे यांच्या शेळ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांच्या १३ शेळ्या मृत झाल्या होत्या. पारंपारीक शेळ्यापालन हा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या झोरे व येडगे कुटुंबाच्या प्रमुख व्यवसायावर संकट कोसळले होते. दोन्ही कुटुंबांना या संकटातून सावरता यावे व व्यवसायात पुन्हा उभारी यावी यासाठी धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग संस्थेच्या व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन प्रत्येकी दहा हजाराची आर्थिक मदत दिली आहे.
यावेळी धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष आर.डी.जंगले, सचिव एकनाथ जानकर, कणकवली संघटक महादेव खरात, कुडाळ संघटक धाकू झोरे, कानू शेळके, मालवण संघटक विनायक जंगले, संदीप शिंगाडे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप जंगले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख दिपक खरात, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष राहू खरात, मालवण तालुका उपाध्यक्ष निकेश झोरे, पांडूरंग येडगे, रमेश येडगे आदी उपस्थित होते.आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक मदतीचा हात देणा-या सर्व धनगर समाज बांधवांचे व कार्यकर्त्यांचे पदाधिका-यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page