सिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती..

सिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाने संजय कापडणीस यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी राजेंद्र पराडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तब्बल पावणे दोन वर्षानंतर हे पद भरण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी हे पद ३० जून २०१९ पासून रिक्त आहे. तत्कालीन अधिकारी श्री जगताप सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर काही कालावाधी याची अतिरिक्त जबाबदारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे होती. त्यानंतर ही अतिरिक्त जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे होती. कापडणीस हजर झाल्याने तब्बल पावणे दोन वर्षा नंतर जिल्हा परिषदेला हक्काचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत.

अभिप्राय द्या..