आमदार किरण पावसकर यांना पितृशोक..

आमदार किरण पावसकर यांना पितृशोक..

आचरा /-

आमदार किरण पावसकर यांचे वडील जगन्नाथ पावसकर उर्फ पावसकर गुरुजी वय ९३ यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी यांनी शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले होते. सोमवारी सकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले.उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.आमदार किरण पावसकर, डॉ शाम पावसकर यांचे ते वडील होत.

अभिप्राय द्या..