डॉ.श्रीमंत चव्हाण यांना जामीन मंजूर.;ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद..

डॉ.श्रीमंत चव्हाण यांना जामीन मंजूर.;ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद..

सिंधुदुर्ग /-

विनयभंगाच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या सिव्हिल सर्जन डॉ.श्रीमंत चव्हाण यांची मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक असलेल्या महिला कर्मचारी विनयभंग प्रकरणी डॉ.श्रीमंत चव्हाण हे हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर स्वतःहून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. डॉ.चव्हाण यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज डॉ.चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने डॉ श्रीमंत चव्हाण हे सिव्हिल सर्जन असल्यामुळे साक्षीदारावर दबाव आणू शकतात. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आरोपी डॉ. चव्हाण यांच्या वतीने यशस्वी युक्तिवाद करताना वकील उमेश सावंत यांनी डॉ.श्रीमंत चव्हाण हे सध्या सिव्हिल सर्जन पदावर कार्यरत नाहीत. त्यामुळे साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रश्न येत नाही. तसेच 22 फेब्रुवारीपासून मागील 50 दिवस या गुन्ह्याचा तपास पोलीस करताहेत.पोलिसांना आरोपीच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत तपासासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. त्यामुळे पोलीस कोठडी नाकारावी असा जोरदार युक्तिवाद केला. मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी वकील उमेश सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून डॉ.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यानंतर आरोपीच्या वतीने जामिनावर मुक्तता होण्यासाठी सादर करण्यात आलेला अर्ज मंजूर करत 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि साक्षीदारावर दबाव आणू नये या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

अभिप्राय द्या..