सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 671 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 792 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 117 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. दोन रुग्णाचे निधन झाले आहे. ४८ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.