वेंगुर्ला / –
कोरोना लसीकरण हे अत्यंत आवश्यक असुन संपूर्ण सुरक्षित आहे.त्या बाबतीत जनसामान्यांमध्ये
बरेच गैरसमज अजूनही आहेत.याबाबतीत जनजागृती करून सर्व स्तरातील जनतेने लसीकरणचा फायदा घेऊन देश कोरोना मुक्त केला पाहिजे,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे कोरोना लसीकरण झालेले रुग्ण यांचे सत्कार व कोरोना योध्दा यांना फेसशिल्ड वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी ‘कोविड लस मदत केंद्र’ चालवण्यात येत आहेत.याचाच भाग म्हणून
राष्ट्रवादी डॉक्टर सेल सिंधुदुर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने आरोग्य दिनाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एम्.के गावडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोना सुरक्षेसाठी फेसशिल्ड वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेरसचे प्रांतिक सदस्य एम्. के. गावडे, राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल,वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद परब, खरेदी विक्री संघ संचालक पराग सावंत, मराठा संघाचे दिलिप परब,श्रीकृष्ण जानकर, अनिकेत कुंडगिर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जुन्नरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सई लिंगवत, आरोग्य सहाय्यक रूपेश नेर्लेकर, आरोग्य सहाय्यिका एम. सी. परब, औषध निर्माण अधिकारी पि. बी. रेडकर, स्टाफ नर्स प्रिया वजराटकर, परिचारिका कुंभार, आरोग्य कर्मचारी जावेद शेख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रमोला सातवेकर, तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. संजीव लिंगवत यांनी कोरोना लसीकरण सुरक्षितता व महत्त्व याबाबतीत सविस्तर विवेचन केले.