सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ८८ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.. तर ३० जणांनी केली मात.;तर जिल्ह्यात आज तीन कोरोना बळी…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ८८ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.. तर ३० जणांनी केली मात.;तर जिल्ह्यात आज तीन कोरोना बळी…

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ३० रुग्णानी कोरोनावर मात केली आहे.

तसेच तीन रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. निधन झालेल्यामध्ये कुडाळ येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश असून त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील ६३ वर्षीय पुरुषाचा आणि देवगड तालुक्यात शिरगाव येथील ७४ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोघांनाही मधुमेहाचा आजार होता.

अभिप्राय द्या..