मुंबई /-

राज्यातील शिक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे ऐन मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पहिली ते आठवी या वर्गाच्या परीक्षा न घेता संबंधित विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे . राज्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांना बढती दिली जाणार आहे तर इयत्ता नववी व अकरावी च्या परीक्षेबाबत थोड्याच दिवसात निर्णय जाहीर केला जाईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page