शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी तेरवण मेढे व सोनवल गावातील प्राथमिक शाळांना भेट देत केली पाहणी..

शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी तेरवण मेढे व सोनवल गावातील प्राथमिक शाळांना भेट देत केली पाहणी..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील अनेक शाळांतील प्रश्न प्रलंबित असल्याने ते सोडवण्याच्या दृष्टीकोनातून शाळांची पाहणी करणे गरजेचे असून
सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ.अनिषा शैलेश दळवी यांचेकडुन तेरवण मेढे व सोनावल गावातील प्राथमिक शाळांना भेटी देवून आढावा घेण्यात आला.तेरवण मेढे शाळा नं.३ आणि जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सोनावल येथे सुरु असलेल्या शाळेच्या नवीन इमारतीची ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थासह पहाणी सौ.दळवी यांनी केली.
तेरवण मेढे शाळा नं.३ चे छप्पर खराब झाले असल्याने शाखा अभियंता बांधकाम यांचेकडून तातडीने अंदाजपत्रक तयार करुन घेऊन सदर शाळेची छप्पर दुरुस्ती करण्यात येईल,असे आश्वासित करण्यात आले.
यानंतर जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सोनावल च्या नवीन इमारतीची पाहाणी करण्यात आली.सदर काम हे नियोजित अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट होत असलेच्या तक्रारी येत आहेत.त्यामुळे सोनवल शाळा व्यवस्थापन समिती,बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांची एकत्रित बैठक होवून कामाचा दर्जा तपासून घेणे आणि जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे अंदाजपत्रकानुसार योग्यरीतीने काम होत नाही तो पर्यंत काम सुरू करू देवू नका अशा सूचना शाळा व्यवस्थापन समिती,सोनावल यांना देण्यात आल्या.याशिवाय आपल्या स्तरावरून सदर बाबतीत लक्ष देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांचेसोबत भाजपा दोडामार्ग तालुकाअध्यक्ष श्री.प्रविण गवस,ग्रामपंचायत सदस्य श्री.मायकेल लोबो,सदस्या सौ.नमिता गवस,तेरवण मेढे माजी सरपंच श्री.प्रविण गवस,सोनावल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुभाष देसाई,भाजपा बूथप्रमुख श्री.विठ्ठल आपा गवस,शिक्षिका सौ.गीतांजली सातार्डेकर,शिक्षकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..