आचरा गाउडवाडी टेंब,पांगे कंपाऊंडला उधाणाचा फटका..

आचरा गाउडवाडी टेंब,पांगे कंपाऊंडला उधाणाचा फटका..

आचरा /-
बुधवारी दुपारी आलेल्या उधाणाचा फटका आचरा गाउडवाडी टेंब,पांगेकंपाउंड भागाला बसला असून खारया पाण्यामुळे माडबागायतीला धोका निर्माण झाला आहे.बुधवारी दुपारी आलेल्या उधाणामुळे पांगे कंपाऊंड परीसरात उधाणाचे पाणी शिरले होते.याबाबतची खबर मिळताच आचरा सरपंच प्रणया टेमकर माजी सरपंच चंदन पांगे यांनी पहाणी केली.

**आचरा गाउडवाडी जामडूल रस्त्याच्या मोरी नादुरुस्त*
गाउडवाडी जामडूल रस्त्याच्या मोरया नादुरुस्त झाल्याने पाणी निचरा होत नसल्याने सदर मोरया बदलण्याची मागणी चंदन पांगे यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..