विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकरयांनी उन्नती साधावी.;राजश्री कोदे

विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकरयांनी उन्नती साधावी.;राजश्री कोदे

चिंदर सडेवाडी गोलतकर पेट्रोल पंप येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ

आचरा /-
शासनाच्या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी स्वत:चे विक्री व्यवस्थापन निर्माण केल्यास त्यातून चांगला लाभ मिळू शकतो. या दृष्टीने विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उन्नती साधण्याचे आवाहन चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी चिंदर सडेवाडी येथे केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ चिंदर सडेवाडी येथे सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते केला गेला या वेळी त्या बोलत होत्या या वेळी त्यांच्या सोबत तालुका
कृषी अधिकारी व्हि जी गोसावी, माजी उप सभापती अशोक बागवे, प्रगतशील शेतकरी शशिकांत गोलतकर, कृषी पर्यवेक्षक आचरा ए्व्ही गवंडे, कृषी पर्यवेक्षक रामगड अय्याज शेख, कृषी सहाय्यक सुनील कदम, सिताराम परब, , दिगंबर मुंबरकर, कृषी सहाय्यक त्रिंबक एस डी शिंदे, कृषी सहाय्यक आडवली ए डी कुरकुटे चिंदर ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू ,बच्चू सद्गुरू, पाटील यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

प्रगतशील शेतकरी शशिकांत गोलतकर यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या विविध फळे यात आंबा, कलिंगड,करमाळे,चिकू सुपारी,नारळ,करवंदे,आवळा आदी कृषी मालाची विक्री विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत स्टाॅल उभारून सुरू करण्यात आली आहे. या बाबत बोलताना

माजी उपसभापती अशोक बागवे यांनी शशिकांत गोलतकर यांनी सुरू केलेले विक्री व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असल्याचे सांगितले.सुत्रसंचलन आणि आभार अय्याज शेख यांनी मानले
.

अभिप्राय द्या..