कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेची बैठक आज कुडाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी वेंगुर्ले तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे,तर उपाध्यक्षपदी आसोली ग्रामपंचायतीचे उपसंरपंच गंगाराम केरकर,तर सचिवपदी रेडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व विदयमान सदस्या सौ.सायली पोखरणकर यांची निवड करण्यात आली.तर सदस्यपदी मेढा निवती ग्रामपंचायतीचे उपसंरपंच अजित खवणेकर,सागर तिर्थ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.सुषमा गोडकर,चिपी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच संजय करंगुटकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,उपाध्यक्ष सौ.मनस्वी परब,सचिव हेंमागी तेली,खजिनदार अमित फोंडके,आमडोस ग्रामपंचायतीच्या उपसंरपंच सौ.भारती आयरे तर आंदुर्ला ग्रामपंचायतीचे उपसंरपंच ज्ञानेश्वर तांडेल,हुमरस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच महादेव परब,गावराई ग्रामपंचायतीचे उपसंरपंच संजय आयरे,रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव तारी आदी उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर वेंगुर्ले तालुक्यातील सागर तिर्थ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ.सुषमा गोडकर व मालवण तालुक्यातील साळेल ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच रविंद्र साळसकर यांचा जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.