सनराईज कॉयर क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी.;जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे

सनराईज कॉयर क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी.;जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे

वेंगुर्ला /-
सनराईज कॉयर औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून निरवडे कोनापाल येथे होत असलेल्या सुमारे पावणे दोन कोटींच्या क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून नजीकच्या काळात पाचशेहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.तसेच क्लस्टरच्या माध्यमातून ज्या महिलांना वैयक्तिक युनिट हवे असेल त्यांनाही १ लाख, ५ लाख व २५ लाखांची युनिट्स उभारून दिली जातील. या माध्यमातून तयार होणाऱ्या मालाच्या विक्रीची जबाबदारी ही संस्था घेणार असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळावे,असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा कृषीभूषण एम. के. गावडे यांनी केले.सनराईज कॉयर औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा निरवडे येथे संपन्न झाली.यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, जिल्हा बँक संचालक तथा महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, माजी सभापती प्रियांका गावडे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, सनराईज संस्था अध्यक्षा राखी कळंगुटकर, निलम संस्था अध्यक्षा गीता परब, सचिव श्रुती रेडकर, संचालिका दिव्या वारंग, सुजाता देसाई, शिल्पा सावळ, राखी जाधव,ग्रामसेवक घाडी,
ग्रा.पं. सदस्या निकिता बुगडे, माजी ग्रा.पं. सदस्या शिला मांजरेकर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काथ्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मळगाव सरपंच व उपस्थित सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सनराइज
संस्थेच्या क्लस्टरसाठी भाड्याने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक दिव्या दत्तात्रय वारंग यांना कल्पवृक्ष भेट देत सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..