आडवली येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ!

आडवली येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ!

मसुरे /-

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आडवली येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे शुभारंभ विलास लाड यांच्या स्टॉलवर उपसभापती राजू परुळेकर उपसभापती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.यावेळी श्री परुळेकर यांनी मार्गदर्शन करताना कृषी विभाग राबवित असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित शेतकऱ्यां मार्गदर्शन करताना शेतक-यांची उत्पादित केलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास मध्यस्थी/दलाल कमी होतील व पर्यायाने आपल्या उत्पादनात वाढ होईल या करीता इतर शेतकऱ्यांनी सुध्दा उत्पादित केलेला शेतमाल स्वतः विक्री करावा. राजेंद्र पराडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा स्थानिक पातळीवर शेतमाल पिक घेऊन भागविल्यास शेतकऱ्यांच्याच फायदा आहे,विकणारा व पिकविणारा दोघेही नफ्यात येऊ शकतात.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सरपंच श्री.सतिष आडवलकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण लाड, श्रावण उपसरपंच प्रमोद घाडीगांवकर, पोलीस पाटील श्री.चंद्रदिपक मालंडकर,कृषी पर्यवेक्षक श्री.ए.ई.शेख, .एस.डी.शिंदे,श्री.ए.डी.कुरकुटे,श्री.विलास रामचंद्र लाड,श्री.भार्गव रामचंद्र लाड,श्री.विलास घाडीगांवकर,श्री.संतोष चिंदरकर व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

अभिप्राय द्या..