मालवण येथे जागतिक महिला दिन, स्वराज्य संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न..

मालवण येथे जागतिक महिला दिन, स्वराज्य संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न..

विविध प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा करण्यात आला सन्मान..

मालवण/-

जागतिक महिला दिन व स्वराज्य महिला संघटनेचा वर्धापनदिन आज संस्थेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त फातिमा कॉन्व्हेट या संस्थेला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली तर विविध प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन देत आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, नाभिक समाजाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, दीपा पवार, साक्षी मयेकर, दिया पवार, मेघा शेलटकर, श्रुती धुरी, स्नेहा कुडाळकर, सुवर्णा चव्हाण आदी उपस्थित होत्या. कोव्हीड काळात फातिमा कॉन्व्हेटसारख्या संस्था अडचणीत आल्या आहेत. या संस्थांना आर्थिक मदतीची गरज असून दात्यांनी पुढाकार घेत या संस्थांना
आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अभिप्राय द्या..