देवगड – वागदेवाडी बसफेरी उद्या पासून पूर्ववत धावणार!

देवगड – वागदेवाडी बसफेरी उद्या पासून पूर्ववत धावणार!

भाजपच्या गोविंद सावंत यांच्या प्रयत्नांना यश

देवगड /-

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन पासून बंद असलेली देवगड खुडी वागदेवाडी ही एसटीची फेरी मंगळवार ९ मार्च पासून पूर्ववत चालू होणार असल्याची माहिती मुणगे येथील भाजप नेते गोविंद सावंत यांनी दिली. देवगड एस टी आगाराचे मॅनेजर श्री बोधे यांची भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन बंद असलेली बस फेरी चालू करण्याची मागणी केली होती. मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव , भाजपचे नेते गोविंद सावंत , अरविंद सावंत , शेखर तेली , संजय आईर , गणपत रूपे इत्यादी उपस्थित होते.
सदर बस खुडी वागदेवाडी येथे वस्तीला राहणार असून वागदेवाडी वरून पहाटे ५.३० ला सुटल्या नंतर आचरा, पोयरे, मशवी मार्गे मुणगे भगवती मंदिरला सकाळी ६.४५ ला येणार आहे. व पुढे ती देवगड येथे जाणार आहे. या बस फेरीसाठी गोविंद सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. कॉलेज विध्यार्थी, प्रवाशांची होणारी गैरसोय दुर होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..