वेंगुर्ला /-
वेंगुर्ले नगरपरिषद वेंगुर्ले व महिला व बालकल्याण स्वास्थ्य समिती यांच्या वतीने आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सभागृह येथे नगरपरिषद कार्यालयीन महिला व स्वच्छता कर्मचारी(महिला),मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट कार्ड वाटप शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,
नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेविका साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल,शितल आंगचेकर,श्रेया मयेकर,स्नेहल खोबरेकर,पूनम जाधव,कृपा मोंडकर,प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,वरदान लॅबोरेटरीच्या संचालिका वेलांकली कार्डोज आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये वरदान लॅबोरेटरीच्या संचालिका वेलांकली कार्डोज यांनी रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी केली.या शिबिरामध्ये एकूण ५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आले.कोव्हीड १९ बाबतचे शासन नियम पाळून हे शिबिर संपन्न झाले.