ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार विनोद दळवी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार विनोद दळवी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

सिंधूदुर्गनगरी //

महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘महासमृद्धि महिला सक्षमिकरण अभियान’ कार्यक्रमात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०२१ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दै सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांना देवून सन्मानित करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दिपाली पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक पी के प्रामाणिक, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते. जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०२१ मधील विजेते बचतगट, बँक व पत्रकार यांना यावेळी प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

अभिप्राय द्या..