मसुरे /-

प्राथमिक शिक्षकांना 12 वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर द्यावयाची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना जिल्हा शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी 229 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर केले असून शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने नव्याने मार्च 2021 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागितले आहेत याही प्रस्तावांना नजिकच्या कालावधीत मंजूरीसाठी जिल्हास्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी माहिती प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी म्हणजेच चटोपाध्याय वेतनश्रेणी 237 प्रस्ताव जि प शिक्षण विभागाकडे गेले वर्ष दिड वर्ष मंजूरीच्या प्रतिक्षेत होते. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने मा. शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग, मा . वित्त व लेखा अधिकारी सिंधुदुर्ग, मा . मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग तसेच मा . आयुक्त , कोकण विभाग यांजकडे निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून सततचा पाठपुरावा करून प्रशासनाकडून ज्या त्रुटी काढल्या जात होत्या त्यावर तोडगा काढण्यासाठी साठी जे प्रयत्न करण्यात आले त्याला यश मिळून अखेर 237 प्रस्तावांपैकी 229 प्रस्ताव मंजूर करण्यात आले त्यामध्ये देवगड -20, कणकवली-28, कुडाळ-54, दोडामार्ग-24, मालवण -24, वेंगुर्ला -35, वैभववाडी-7, सावंतवाडी-37 शिक्षकांचा समावेश आहे. याबाबत शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी प्रस्ताव मंजूर केल्यामुळे प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षक समिती नेहमीच शिक्षक बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असते, सतत शासन प्रशासन स्तरावर निवेदने, चर्चा, भेटी आदींच्या माध्यमातून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करत असते. असेही प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम व जिल्हा सरचिटणीस श्री सचिन मदने यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page