जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान..

जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान..

आचरा /-

आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यावर सायंकाळी समुद्राच्या लाटांबरोबर तुटक्या जाळ्यात अडकलेले कासव किनाऱ्यावर आले होते तुटक्या जाळ्यात पुर्णतः गुरफटून गेलेल्या कासवाची रामेश्वर रापण संघाच्या सदस्यांनी बऱ्याच मेहनतीने तुटक्या जाळ्यातून सुटका करत पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले आहे
मासेमारीची तुटलेली जाळी समुद्री जीवांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललेली आहेत. असेच एक समुद्री कासव तुटक्या जाळ्यात गुरफटलेल्या अवस्थेत आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यावर वाहत आले होते पुर्णतः जाळ्यात गुरफटल्याने त्या कासवाला हालचाल करताही येत नव्हती. आचरा किनाऱ्यावर काम करत असलेल्या रामेश्वर रापण संघाच्या सदस्यांना जाळ्यात कासव अडकून पडल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला सुरक्षित जागेत आणून तुटक्या जाळ्यांमध्ये जखडून पडलेल्या कासवाची बऱ्याच मेहनतीने सुटका करत त्याला पुन्हा समुद्रात सोडले.

अभिप्राय द्या..