जि.प.अध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा..

जि.प.अध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील डी एस एन कार्यालयाला भेट देत शुभेच्छा स्विकारल्या व चहापान केले. याप्रसंगी डी एस एस चे संचालक/संपादक प्रमोद गवस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी ग्लोबल महाराष्ट्रचे पत्रकार सुमीत दळवी, लोकसंवाद लाईव्ह न्युजचे पत्रकार प्रशांत गवस,तसेच, राणे इन्श्युरन्सचे अमित राणे नारायण नाईक उपस्थित होते.

श्री म्हापसेकर यांनी आपणाला ही अध्यक्षपदाची संधी खासदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यामुळे मिळाली असून दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आपण सतत कार्यरत राहू असे सांगताना आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दोडमार्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांकडून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..