सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण ७ फेब्रुवारीला

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण ७ फेब्रुवारीला

सावंतवाडी /-

येथील पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण रविवार 7 तारखेला महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून सकाळी साडेदहा वाजता जिमखाना येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर पंचायत समिती सभापती मानसी धुरी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार राजाराम म्हात्रे राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे उपस्थित राहणार आहे.यावेळी सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष विजय देसाई सचिव अमोल टेंबकर व खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..